Posts

प्रेम पण हे प्रेम शांत आहे

सुरवात अशी आहे की मी ज्या पोरीला सुरुवातीपासून बघतोय तीच पोरगी board ला माझ्या वर्गात आली.. मग काय अभ्यासा सोबत तीलाही बघायची तयारी सुरु झाली. मग काय पेपर लिहता लिहता हळूच तीला पहायच. अन ती मजाच वेगळी होती. अस करता करता पेपर संपत पण आले, पण माझ्यात काय तीला propose करायची हिम्मत नाय आली. मग काय सुट्या पडल्या. दिवसभर तीचाच विचार मग एक काम केल तीला social media वर शोधल आणि तीला follow करायला सुरुवात केली. मग हळू हळू मी तीच्याशी बोलत गेलो. ती पण माझ्याशी बोलायला लागली. मग मी रोज तीचे photo व Dp बाघायला लागलो. हे असे खूप दिवस चालू लागले . तरी पण अजूनही तीला propose करायची भिती च वाटत होती. ती हा बोलेल का नाही , हा प्रश्न तर मला नेहमीच पडायचा. मग मनात विचार येत होता की तीला propose केला की तिची आणि माझी friendship तुटली तर? तीने मला block केल तर? मग मी शांत पणे विचार केला आणि ठरवली की तीला कधी सांगयच नाही कि ती मला आवडत होती. हे decision घेताना खूप त्रास झाला पण काय करणार दुसरा पर्याय पण नव्हता. आता फक्त रोज तीचे photo गुपचूप बघायचे आणि खुश रहायच.
Recent posts